वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतून बाहेर, ९ उमेदवारांची घोषणा !

मुंबई – वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. वंचित बहुजन आघाडी लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २७ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत केली. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ९ उमेदवारांची नावेही घोषित केली आहेत. उमेदवारांची नावे घोषित करण्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली.