भोजशाळेत सर्वेक्षणाचा पाचवा दिवस : २६ एप्रिलला पूजा आणि हनुमान चालिसा पठण !
धार (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाच्या आदेशानुसार भोजशाळेत वैज्ञानिक सर्वेक्षण केले जात आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचा आज पाचवा दिवस आहे.
सौजन्य : DD NEWS सह्याद्री (चित्रफीतीत चौथा दिवस आहे)
देहली आणि भोपाळ येथील ‘एएस्आय’च्या अधिकार्यांचे पथक भोजशाळेत सर्वेक्षण करत आहे. प्रत्येक मंगळवारी हिंदू भोजशाळेत पूजा करतात आणि हनुमान चालिसाचे पठण करतात. अशा स्थितीत मंगळवारी सर्वेक्षणाच्या वेळी भोज उत्सव समितीकडून पूजा आणि हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. महिलांनी भजन गायले आणि फेरही धरला.