Delhi GHARWAPSI : देहलीत एका मुसलमान मुलीची हिंदु धर्मात ‘घरवापसी’!
(घरवापसी म्हणजे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश)
नवी देहली : देशाची राजधानी देहलीत नुकतीच एका मुसलमान मुलीने हिंदु धर्मात ‘घरवापसी’ केली. हिंदु धर्म स्वीकारलेल्या या मुलीचे नाव उज्मा असून ती आता मीरा म्हणून ओळखली जाणार आहे. २६ मार्च २०२४ या दिवशी आर्य समाज मंदिरात मीराचा अनिल नावाच्या तरुणाशी विधिवत् विवाह झाला. ‘हिंदु मोर्चा’च्या पदाधिकार्यांनी या कामी सहकार्य केले, तसेच नवविवाहित जोडप्याला सन्मान आणि सुरक्षा पुरवण्याचे वचनही दिले.
A Mu$|!m girl named Uzma does #Gharwapsi and marries a Hindu boy at Arya Samaj in Delhi; will be recognized as Meera
The leaders of the 'Hindu Morcha' assisted, as well as pledged to honor and provide security to the newly wedded couple.
The newly wedded couple promised honour… pic.twitter.com/k9ZlEETiki
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 28, 2024
‘हिंदु मोर्चा’चे अध्यक्ष दीपक मलिक यांनी सांगितले की, मुलीचे कुटुंब मूळचे शाहजहांपूरचे असून सध्या पश्चिम देहलीत रहाते. येथेच उज्माची अनिल वाल्मीकि याच्याशी ओळख झाली. दोघेही एकमेकांना आवडू लागले. उज्मा आणि अनिल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला; पण उज्माच्या कुटुंबाने या लग्नाला विरोध दर्शवला. अनिल आणि उज्मा हे त्यांच्या लग्नाला पाठिंबा देण्यासाठी ‘हिंदु मोर्चा’शी संपर्क साधला. अखेर २६ मार्च २०२४ या दिवशी उज्मा घरातून बाहेर पडली आणि थेट आर्य समाज मंदिरात पोचली. येथे उज्माने प्रथम हिंदु धर्म स्वीकारला आणि मीरा बनून नंतर अनिलशी विवाह केला.