गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चा न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप
इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या ६ न्यायाधिशांचा आरोप
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आय.एस्.आय.’ न्यायालयीन कामकाजामध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या ६ न्यायाधिशांनी केला. या प्रकरणी या न्यायाधिशांनी सर्वोच्च न्यायिक परिषदेला एक पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. या पत्रात ‘आय.एस्.आय.’चे काही अधिकारी न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप करत कसा प्रभाव पाडतात ? याविषयीची माहिती त्यांनी दिली आहे.
अशा प्रकारच्या हस्तक्षेपामुळे आणि अपप्रचारामुळे एका न्यायाधिशांना त्यांचे पद सोडावे लागले होते. यानंतर गुप्तचर संस्थाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी यासंदर्भात चर्चाही करण्यात आली; मात्र तरीही यावर तोडगा निघाला नाही.
संपादकीय भूमिका
|