मुंबईत तक्रार केल्यावर लाओस देशातील तिघांविरोधात गुन्हा नोंद !
चांगल्या वेतनाचे आमीष दाखवून भारतियांना फसवल्याचे प्रकरण
मुंबई – थायलंडमध्ये चांगल्या वेतनाचे आमीष दाखवून भारतातील तरुणांना लाओस देशात बेकायदेशिररित्या नेण्यात आले. तेथील बेकायदेशीर कॉलसेंटरमध्ये काम करण्यास त्यांना भाग पाडण्यात आले. आरोपी कॉलसेंटरद्वारे अमेरिका, युरोप आणि कॅनडा येथील नागरिकांची सायबर फसवणूक करत होते. तेथील भारतीय वकिलातीकडे तक्रार केल्यानंतर या तरुणांची सुटका झाली असून त्यातील एकाच्या तक्रारीवरून मुंबईत या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा अधिक अन्वेषण करत आहे. तक्रारदार तरुण ठाण्यातील आहे.
संपादकीय भूमिकाअशी फसवणूक करणार्यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! |