दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कोयत्याचा धाक दाखवणारा गुंड अटकेत !; आचार्यावर जीवघेणे आक्रमण करणार्या दोघांना अटक !…
कोयत्याचा धाक दाखवणारा गुंड अटकेत !
डोंबिवली – १८ महिन्यांसाठी हद्दपार केलेल्या एका तडीपार गुंडाने येथे पादचार्यांना कोयत्याचा धाक दाखवून घाबरवले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. गणेश उपाख्य गटल्या बाळू आहिरे असे त्याचे नाव आहे.
तडीपारीचा उपयोग नसल्याचे सिद्ध !
आचार्यावर जीवघेणे आक्रमण करणार्या दोघांना अटक !
महाड – येथील उपाहारगृहात गोंधळ करणार्या दोघांना रोखण्याचा प्रयत्न करणार्या आचार्यावर धारदार शस्त्राने जीवघेणे आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी राज तांबे आणि अमृत तांबे यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. आचारी बाळकृष्ण साळुंखे (वय ४० वर्षे) त्यांच्यातील वाद थांबवण्याचा प्रयत्न करत होते.
संपादकीय भूमिका : वाढती हिंसक वृत्ती धोकायदायक !
नाशिक महापालिका मूर्तीकारांना शाडू माती विनामूल्य देणार !
नाशिक – गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्तींचा १०० टक्के वापर करण्याच्या दृष्टीने महापालिका मूर्तीकारांना जागा उपलब्ध करून देणार आहे. त्यांना शाडू मातीही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी महापालिकेकडे १५ एप्रिलपर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. (कौतुकास्पद निर्णय ! – संपादक)
नवी मुंबईत आज पाणीपुरवठा होणार नाही !
नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेचे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनी येथे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे २७ मार्च या दिवशी संध्याकाळी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र, कामोठे आणि खारघर नोड येथील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. २८ मार्च या दिवशी वरील ठिकाणी अल्प दाबाने पाणीपुरवठा होईल. त्याअनुषंगाने या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.