सनातन हिंदु धर्मशास्त्राचे मंडन आणि पाखंडाचे खंडण करणारे प.पू. गुरुदेव !
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
तो एकच एक परमात्मा सर्व चराचरात पहाण्यासाठी ती क्षमता यायला पतीच्या शवासह सती जाणार्या पतिव्रतेपेक्षाही मोठा अधिकार लागतो. तिला पेटत्या ज्वलंत निखार्यावरून चालायचे असते, पाऊल वाकडे पडायला नको असते. पाऊल अधांतरी टाकायचे नसते. चेहर्यावर तर प्रसन्न स्मित दाखवायचे असते. आव तर असा आणायचा असतो की, जणु मृदू फुलांच्या पायघड्यांवरून चालले आहे.
दिवसाचे १८ घंटे सतत लेखन करत प.पू. गुरुदेवांनी अक्षरवाङ्मय निर्माण केले. धर्मावरील पाखंडांच्या आघातांचे खंडण केले. ‘अन्याय घडो कोठेही, चिडून उठू आम्ही । चाबूक उडो कोठेही, वळ पाठीवर आमच्या ।’ (कवी अनिल यांनी लिहिलेले काव्य) या वृत्तीने त्यांनी पाखंड खंडणाचे कार्य स्वीकारले. उच्च कोटीतील योगी, श्रीविद्येचे महान उपासक, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे गाढे अभ्यासक अन् पाखंडाचे खंडण, तसेच सनातन हिंदु धर्मशास्त्राचे मंडन करणारे प.पू. गुरुदेव !
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१८)