प्रियकराचे लग्न मोडण्यासाठी महिलेकडून लैंगिक शोषणाची तक्रार !
मुंबई – प्रियकराचे लग्न मोडण्यासाठी महिलेने स्वतःच्या मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची तक्रार केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ‘पॉक्सो’च्या गुन्ह्यातील ऋषिकेश गिरी याला जामीन संमत केला. ऋषिकेशचे तक्रारदार महिलेसमवेत प्रेमसंबंध होते; पण त्याचे दुसर्या मुलीशी लग्न ठरले. महिलेने त्याला लग्नानंतरही शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले; पण त्याने नकार दिल्याने तिने तक्रार केली होती.