निराशा आणि चिंता
१. निराशा
जो निराश होतो, तो नास्तिक. ‘जीवनाला चिंतेने स्पर्श करू नये’, असे वाटत असेल, तर त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे सदैव कामात गढून रहाणे. जीवनात रिकामपणा असता कामा नये. जे कधीही रिकामे नसतात, ते देव. जे रिकामटेकडे असतात, ते असुर.
२. चिंता
चिंता ही भगवंताची मुलगी असल्यामुळे ती सभ्य आहे. ‘तुम्ही कामात आहात’, असे पाहिल्यावर सभ्य माणसे जशी तुम्हाला त्रास देत नाहीत, त्याप्रमाणे चिंता पण तुम्हाला त्रास देत नाही. रघुवंशीय राजे सदैव उद्योगमग्न असत.
(साभार : ग्रंथ ‘भारतीयांचे सांस्कृतिक आदर्श जीवन’ – प.पू.पांडुरंगशास्त्री आठवले यांची प्रवचने)