अपालाताई आहे गुरुचरणांवरील सुंदर साधक फूल ।
‘२७.३.२०२४ (फाल्गुन कृष्ण द्वितीया, तुकारामबीज) या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर हिचा १७ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना पाठक (वय १२ वर्षे) हिला गुरुकृपेने अपालाविषयी सुचलेली कविता येथे दिली आहे.
कु. अपाला औंधकर हिला १७ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! |
दैवी सत्संगाच्या (टीप १) माध्यमातून साधकांना करते साहाय्य ।
प्रेमभाव अन् तत्त्वनिष्ठतेचा सुरेख संगम आहे तिच्यात ।। १ ।।
श्रीमहाविष्णुप्रती (टीप २) असे तिचा उत्कट भाव ।
भूवैकुंठ रामनाथी आहे तिचे आध्यात्मिक धाम ।। २ ।।
तिच्या मनी असे गुरुसेवेचा अखंड ध्यास ।
मनापासून धरली तिने गुरुभक्तीची कास ।। ३ ।।
नृत्याराधनेतून अनुभवते ती गुरुदेवांना ।
अहंभाव नसे तिच्यात नृत्यकलेचा ।। ४ ।।
अपालाताई आहे गुरुचरणांवरील सुंदर साधक फूल ।
शिकता येऊदे आम्हाला तिच्याकडून अनेक दैवी गुण ।। ५ ।।
कृतज्ञता गुरुदेवा, दिली आम्हाला अशी मधुर अपालाताई ।
तिच्यासम तळमळीने होऊ दे साधना तुम्हाला अपेक्षित अशी ।। ६ ।।
(टीप १ – स्वर्गलोक, उच्च स्वर्गलोक, महार्लाेक येथून जन्माला आलेल्या दैवी बालकांचा सत्संग)
(टीप २ – ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे महाविष्णु आहेत’, असा साधिकेचा भाव आहे.)
– गुरुदेवांचे आनंदी फूल,
कु. प्रार्थना महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १२ वर्षे), पुणे
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |