वर्ष २०३० मध्ये समुद्राला येणाऱ्या भरतीमुळे पृथ्वीचा मोठा भाग जलमय होणार !
चंद्र त्याची जागा पालटत असल्याने ही स्थिती येणार असल्याचा नासाचा दावा !
न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या अभ्यासानुसार वर्ष २०३० मध्ये समुद्राच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. त्यामुळे समुद्राला प्रचंड मोठी भरती येईल. यामुळे पृथ्वीचा बराचसा भाग जलमय होईल. चंद्र त्याची जागा पालटत असल्याने ही स्थिती येणार आहे. ‘नेचर’ जर्नलमध्ये नासाचा हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे समुद्रात भरती आणि आहोटी यांची प्रक्रिया चालू असते. नासाच्या दाव्यानुसार चंद्र प्रत्येक साडेअठरा वर्षांनी मूळ जागेपासून हलकासा सरकतो. यातील अर्ध्या काळात तो समुद्रातील लाटांवर दबाव निर्माण करतो, तर अर्ध्या काळात लाटांचा वेग वाढवतो. या काळात समुद्राची पातळी प्रचंड प्रमाणात वाढलेली असेल आणि असे झाले, तर मोठ्या विनाशाची शक्यता आहे.
संपादकीय भूमिका
|