Shivaraj Tangadagi Controversial Statement : पंतप्रधान मोदी यांचा जयघोष करणार्या विद्यार्थ्यांना थप्पड मारा ! – कर्नाटकातील मंत्री शिवराज तंगदागी
|
बेंगळुरू (कर्नाटक) – पंतप्रधान मोदी यांनी २ कोटी नोकर्यांचे आश्वासन दिले होते; परंतु ते पूर्ण केले नाही. ‘मोदी-मोदी’ असा जयघोष करणार्या त्यांच्या तरुण समर्थकांना आणि विद्यार्थ्यांना थप्पड मारायला हवी, असे विधान कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगदागी यांनी २५ मार्च या दिवशी कोप्पल जिल्ह्यातील निवडणूक प्रचाराच्या वेळी केले. या प्रकरणी कर्नाटकमधील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते आर्. अशोक यांनी शिवराज यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.
Slap the students who chant Modi slogans. – Shivraj Tangadagi, Karnataka Congress leader and State's Culture Minister
Complaint by BJP to #ElectionCommission
Note the violent attitude of the Non-violent – Gandhian #Congress#LokSabhaElections2024 pic.twitter.com/XUmb4zod5S
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 26, 2024
शिवराज तंगदागी पुढे म्हणाले की, भाजप निवडणुकीत प्रचार करत आहे. आता ते कोणत्या तोंडाने मते मागत आहेत ? विद्यार्थ्यांनी रोजगार मागितला, तर भजी विकायला सांगतात. भाजपला लाज वाटली पाहिजे.
संपादकीय भूमिकाअहिंसावादी आणि गांधीवादी काँग्रेसची हिंसाचारी मनोवृत्ती लक्षात घ्या ! अशी काँग्रेस हिंदूंना आतंकवादी ठरवते ! |