गुन्हे शाखेची कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली) येथे अमली पदार्थांच्या कारखान्यावर धाड !
कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली) – येथील इरळी गावात अमली पदार्थ बनवणार्या कारखान्यावर मुंबई गुन्हे शाखेने धाड घातली आहे. या कारवाईत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून अत्यंत दुर्गम असलेल्या या भागातील कारखान्यातून ‘एम्.डी.’ नावाच्या अमली पदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. यापूर्वी पुणे, नाशिकनंतर सांगलीतील कुपवाड येथून ३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या कारवाईमुळे अमली पदार्थ, त्यांची तस्करी, निर्मिती किती खोलवर ग्रामीण पातळीपर्यंत पोचली आहे, तेच समोर येते.