तृतीय पंथियांनी मतदानासाठी कोणत्या रांगेत उभे रहावे ? – तृतीय पंथियांचा प्रश्न

कोल्हापूर – लोकसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ७ मे या दिवशी मतदान होत असून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्नरत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर महिला-पुरुष यांची रांग वेगळी असते; पण आम्ही कोणत्या रांगेत थांबायचे ? असा प्रश्न तृतीय पंथियांना पडला असून त्यांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग बनवण्याची किंवा मतदान करण्यासाठी प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात १८१ तृतीयपंथी मतदार असून ते कोणत्याही रांगेत थांबले, तरी त्यांची चेष्टा होते. या संदर्भात जिल्हा मतदान अधिकार्‍यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे निर्णय मागवला आहे.