धर्मांध मुसलमानाकडून जळून मरणार्या १६ वर्षीय मुलीची कौतुकास्पद प्रार्थना, ‘शाहरुखलाही माझ्यासारखाच मृत्यू येवो !’
‘दुमका (झारखंड) येथे १६ वर्षीय हिंदु मुलीला पेट्रोल ओतून जाळणारा शाहरुख आणि त्याचा मित्र नईम यांना विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना २८ मार्च २०२४ या दिवशी शिक्षा सुनावली जाणार आहे. नईम यानेच शाहरुखला मुलीला जाळण्यासाठी पेट्रोल आणून दिले होते. ९० टक्के भाजल्याने या मुलीवर रुग्णालयात उपचार चालू असतांना तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी ‘शाहरुखलाही माझ्यासारखाच मृत्यू येवो’, असे ती म्हणत होती. दुमका येथे २३ ऑगस्ट २०२२ या दिवशी ही घटना घडली होती.’ (२३.३.२०२४)