प्राध्यापकांना इंग्रजीतून शिकवण्यास सांगणार्या दाक्षिणात्य विद्यार्थ्याला मारहाण !
नाशिक येथील घटना !
नाशिक – सातत्याने इंग्रजी भाषेत प्रश्न विचारून प्राध्यापकांनाही इंग्रजी अथवा हिंदी भाषेतून शिकवण्याची विनंती करणार्या दाक्षिणात्य विद्यार्थ्याला मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी मारहाण केली आहे. या दुखापतीत दाक्षिणात्य विद्यार्थ्याच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. त्याच्या तक्रारीवरून ३ संशयित विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदवला आहे.
१. प्रियांशू राजेशकुमार पांडे असे दाक्षिणात्य विद्यार्थ्याचे नाव असून ओम बहारे, सुरेंद्र सूर्यवंशी, योगेश अहिरे हे तिघे संशयित आहेत.
२. प्रियांशू वारंवार इंग्रजी भाषेत बोलण्यास सांगत असे; पण अन्य विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतून शिकण्यास अडचण येत होती. त्यामुळे त्यांनी वरील प्रकार केला.