खोट्या फेसबूक खात्याद्वारे फसवणूक करणार्याच्या विरोधात गुन्हा नोंद !
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चारकोप विधानसभेचे विभाग अध्यक्ष दिनेश अनंत साळवी यांच्या नावाने अज्ञात सायबर चोराने खोटे खाते उघडले आणि सी.आर्.पी.एफ्.चा कर्मचारी असल्याची बतावणी करून फर्निचरसह इतर घरगुती सामानाच्या विक्रीच्या बहाण्याने फसवणूक केली. चारकोप पोलिसांनी आशीषकुमार या अज्ञात सायबर चोराविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने दिनेश साळवी यांच्या अनेक मित्रांनी त्यांच्याकडे विचारणा केली होती. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
संपादकीय भूमिकावाढत्या सायबर चोरीवर सरकार कधी नियंत्रण आणणार ? |