खोट्या आरोपाखाली घरातील सर्वांना कारागृहात पाठवून १६ लाख ७६ सहस्र रुपयांची चोरी !
नागपूर येथील धक्कादायक घटना !
नागपूर – महिलेच्या विनयभंगाच्या खोट्या आरोपाखाली घरातील सर्वांना कारागृहात पाठवून चोरट्यांनी घरात शिरून चोरी केली आणि १६ लाख ७६ सहस्र रुपयांचा माल चोरला. अरुणकुमार श्यामानंद त्रिपाठी यांनी तक्रार दिली.
अरुण यांच्यावर वस्तीतील महिलेशी झालेल्या भांडणातून विनयभंगाच्या प्रकरणी पालिसांनी गुन्हा नोंदवला होता. त्यातून त्यांच्यासह मुलगा, मुलगी आणि पत्नी यांना पोलिसांनी अटक केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती; पण जामीन मिळाल्याने ते घरी परतले. घरी आल्यावर चोरी झाल्याचे समजले. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (आरोपीचा तात्काळ शोध घेऊन सर्व रक्कम त्याच्याकडून वसूल करून घ्यायला हवी ! – संपादक )