नागपूर येथे मांजराच्या चाव्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू !
नागपूर – येथील हिंगणा तालुक्यातील उखळी गावात रात्री ११ वर्षांच्या मुलाचा मांजराने चावा घेतला. यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. श्रेयांशु कृष्णा पेंदाम असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात अकस्मात् मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.