कचरा व्यवस्थापन आणि चक्रीय अर्थव्यवस्था !
१. प्रदूषण मंडळांचे दायित्व
कचरा व्यवस्थापन आणि त्यातील आव्हाने सोडवण्यासाठी विविध प्रभावी उपाय समजून घेणे आवश्यक आहे. ‘कचरा व्यवस्थापन हे चक्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीतून पहाणे का महत्त्वाचे आहे ? नागरिकांचे दायित्व आणि कचरा पुनर्वापर यांसाठी कोणती धोरणे आहेत ? नियामक संस्था म्हणून महानगरपालिका घनकचरा, प्लास्टिक कचरा, घातक कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा इत्यादी आणि पर्यावरण मैत्रीपूर्ण मार्गाद्वारे चक्रीय अर्थव्यवस्थेसह विविध प्रकारच्या कचरा व्यवस्थापनासाठी विविध राज्यांचे प्रदूषण मंडळे नेहमीच आपली भूमिका बजावतात.
२. चक्रीय अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट !
चक्रीय अर्थव्यवस्था ही आर्थिक प्रणाली असून तिचे उद्दिष्ट हे कचरा आणि संसाधनांचा वापर न्यूनतम करणे हे आहे. चक्रीय अर्थव्यवस्थेच्या योग्य उदाहरणांमध्ये अल्प वापर, पुनर्वापर, पुनर्वक्रीकरण, शाश्वत उत्पादन, संसाधन कार्यक्षमता आणि चक्रीय अर्थव्यवस्था धोरण समाविष्ट आहे. ‘ईको डिझाइन’, पुनर्वापर, दुरुस्ती, नूतनीकरण, पुनर्निर्मिती आणि वाढीव उत्पादक दायित्व योजनांच्या माध्यमातून कचरा रोखण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते. पुरवठा सुरक्षा आणि पर्यावरणीय दृष्टीकोनातून चक्रीय अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणे महत्त्वाचे आहे. ते शाश्वत आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेला आधार देते.
३. ९ सहस्र कोटी टनापैकी केवळ ९ टक्के साहित्यांचे पुनर्चक्रीकरण होणे असुरक्षित !
प्रतिवर्षी ९ सहस्र कोटी टन प्राथमिक साहित्य निसर्गातून काढले जाते आणि ते जागतिक स्तरावर वापरले जाते. यातील केवळ ९ टक्के साहित्यांचे पुनर्चक्रीकरण केले जाते. हे व्यावसायिकरित्या असुरक्षित असून त्याचे मानवी आरोग्य आणि पर्यावरण यांवर हानीकारक परिणाम होत आहेत.
४. कचर्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक !
औद्योगिक आणि विकसित राज्य असल्याने महाराष्ट्रात विविध प्रकारच्या कचरा निर्मितीचे अधिक प्रमाण आहे. प्रतिवर्षी शहरी स्थानिक संस्थांकडून ८४ लाख घनकचर्याची निर्मिती होते. यातील प्लास्टिक कचर्याचे प्रमाण ४४ लाख टन, तर उद्योगांमधून धोकादायक कचरा सुमारे १० लाख टन इतका बनतो. इलेक्ट्रॉनिक कचर्याचे प्रमाण सुमारे १० लाख टन आहे. हा सर्व कचरा योग्य प्रकारे व्यवस्थापित केला गेला नाही, तर त्याची अवैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. त्यात विषारी रसायने पाण्याच्या स्रोतांमध्ये, मातीमध्ये वाहून जातात आणि शेवटी सजीव अन् मानवी शरिरात जाण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवतात.
५. कचरा व्यवस्थापनाचे नियम
कचर्याच्या व्यवस्थापनाच्या नियमांनुसार कचरा निर्मिती न्यून करणे, पुनर्वापर करणे आणि सुयोग्य विल्हेवाट लावणे, कचर्याचे स्रोत वेगळे करणे यांवर भर देण्यात आला आहे. यांव्यतिरिक्त कचरा व्यवस्थापनाचे आणि योग्य विल्हेवाटीचे दायित्व उत्पादकांवर देण्यात आले आहे.
आपल्या मौल्यवान पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि उन्नतीसाठी चक्रीय अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी आपण आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावू.’
(साभार : संजीवन लहरी, जुलै-सप्टेंबर २०२१)