मुंबई पोलीस दलातील अधिकार्याच्या मुलासह महिलेला अटक !
‘सेक्स रॅकेट’चे प्रकरण
मुंबई – सेक्स रॅकेटप्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकार्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. अश्विन कदम असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या कारवाईत कृतिका लाड (वय ३१ वर्षे) या महिलेलाही अटक केली असून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या मानव तस्करीविरोधी कक्षाने ही कारवाई केली. ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘विश्वास’ या हॉटेलवर अश्विन महिलांना देहव्यापारासाठी आणायचा.
पोलिसांकडून सापळा लावून बनावट ग्राहक पाठवून १५ सहस्र रुपयांत व्यवहार ठरवला. यात पैसे घेताच पोलिसांनी कदम याला अटक केली. त्यानंतरच्या अन्वेषणात एका महिलेने त्याला गुन्ह्यात साहाय्य केल्याचे उघड झाल्यानंतर कृतिका लाड हिला अटक करण्यात आली. दोघांवर गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिका
|