देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. डॉ. रितेश अ. शुक्ला, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई.
अ. ‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमामध्ये येऊन मला पुष्कळ सात्त्विक वातावरण अनुभवायला मिळाले. हा अनुभव अकल्पनीय होता.
आ. सनातन संस्थेची स्वयंशिस्त अनुकरणीय आहे. ‘हीच शिस्त जगभरात सगळीकडे निर्माण व्हावी’, असे मला वाटले.
इ. ‘जीवनात होणारे त्रास न्यून करून जीवन सुरळीत कसे करता येईल ?’, हे मला येथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.’ (३१.५.२०२२)
२. सौ. अर्चना आनंद मसुरकर, करंजाडे, पनवेल.
अ. ‘मला देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर प्रसन्न आणि शांत वाटले.
आ. ‘आश्रमातील साधक आणि साधिका कुटुंबाप्रमाणे आनंदी रहातात’, हे पाहून मला पुष्कळ आनंद झाला.
इ. ‘आपल्या चुका शोधून त्या सुधारण्याचा प्रयत्न करणे’, ही संकल्पना मला पुष्कळच आवडली. ‘हा गुण आमच्यातही यावा’, यासाठी आम्ही प्रयत्न करू.’ (३१.५.२०२२)
३. सौ. अपूर्वा तौर, कुर्ला (पूर्व), मुंबई.
अ. ‘देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला भेट देऊन मला पुष्कळ छान वाटले.
आ. मी स्वभावदोष-निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करीन, साधना नियमितपणे करीन आणि इतरांना सांगीन.
इ. मी सात्त्विक उत्पादने आणि सनातनचे ग्रंथ यांविषयीची माहिती इतरांना सांगीन.’ (३१.५.२०२२)