कराड येथे वाहनासह ७ लाख रुपयांचे अवैध मद्य शासनाधिन !
कराड, २५ मार्च (वार्ता.) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या आचारसंहिता काळात कराड शहरातील अनधिकृत उद्योगांवर लक्ष ठेवण्याचे काम कराड पोलीस चोखपणे करत आहेत. कराड पोलिसांनी मलकापूर येथे बैलबाजार रस्त्यावरील गोकाक पेट्रोलपंपाजवळ चारचाकी बोलेरो गाडीतून ७ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य कह्यात घेतले. या प्रकरणी ऋषिकेश दिलीप कणसे यांना कह्यात घेण्यात आले आहे