बिहार, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे ‘लव्ह जिहाद’च्या घटना !
जोधपूर (राजस्थान) येथे मुसलमान तरुणाकडून हिंदु मुलीवर बलात्कार !
इंदूर (मध्यप्रदेश) – देशाच्या कानाकोपर्यात सातत्याने ‘लव्ह जिहाद’च्या घटना समोर येत आहेत. आता बिहार, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे हिंदु मुलींना फसवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर बलात्कार करून त्यांचे बलपूर्वक धर्मांतरही केल्याचे उघड झाले आहे.
जोधपूरमध्ये महंमद नावाच्या मुसलमान तरुणाने नाव पालटून ‘इन्स्टाग्राम’ वर एका हिंदु तरुणीशी मैत्री केली आणि तिला प्रेमाचे आमीष दाखवून त्याच्या जाळ्यात अडकवले. त्याने मुलीला त्याचे नाव बाळू सिंह असल्याचे सांगितले. तो हिंदु आहे आणि प्रतिदिन मंदिरात जातो, असे त्याने सांगितले. पीडित मुलगी त्याच्या जाळ्यात फसली. महंमद उत्तरप्रदेशातून मुलीला भेटण्यासाठी जोधपूरला आला. येथे त्याने तरुणीशी शारीरिक संबंधही ठेवले. शारीरिक संबंधानंतर तरुणीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणणे चालू केले. तेव्हा महंमदने तो मुसलमान असल्याचे तिला सांगितले. तो पीडित मुलीवर मुसलमान होण्यासाठी दबाव आणू लागला. यानंतर मुलीने या प्रकरणाची माहिती कुटुंबियांना दिली आणि पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.
बिहार येथे इम्तियाजने ‘वीरेंद्र’ नाव सांगून अल्पवयीन हिंदु मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !
बिहारमध्ये महंमद इम्तियाज याने ‘वीरेंद्र’ असे हिंदु नाव सांगून एका अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तो नेपाळमधील पारसा जिल्ह्यातील रतनपूर घोराई येथील रहिवासी आहे. नेपाळमधील एका अल्पवयीन हिंदु मुलीला लग्नाचे आमीष दाखवून बिहारमधील बेतिया येथे आणतांना सशस्त्र सीमा सुरक्षादलाच्या पथकाने त्याला कह्यात घेतले.
चौकशीत त्याने सांगितले की, तो मुलीला हनुमान मंदिरात घेऊन गेला, तिच्या कपाळावर कुंकू लावून तिच्याशी लग्न केले. बर्याच दिवसांनी इम्तियाजने पीडित अल्पवयीन हिंदु मुलीला सांगितले की, तो आधीच विवाहित असून त्याला ३ मुली आहेत; मात्र पीडित हिंदु मुलगी नशिबाला दोष देत त्याच्यासमवेत रहात होती. यानंतर आरोपीने मुलीचे धर्मांतर केले. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी नेपाळमध्ये पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.
इंदूर (मध्यप्रदेश) येथे मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीवर बलात्कार आणि धर्मांतरासाठी दबाव !
मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये महंमद फैजान खान नावाच्या मुसलमान तरुणाने लग्नाच्या बहाण्याने हिंदु तरुणीवर बलात्कार केला. यानंतर त्याने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला. पीडित तरुणीने धर्मांतरासाठी नकार दिला, तेव्हा आरोपीने तिला बेदम मारहाण केली. महंमद फैजान खान याला एका हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे की, ४ वर्षांपूर्वी शिकवणी वर्गात तिची भेट उत्तरप्रदेशातील आझमगढ येथील महंमद फैजान खान याच्याशी झाली होती. यानंतर फैजानने तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला. धर्मांतर न केल्यास तिच्या आईला आणि भावाला जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करून अन्वेषण चालू केले आहे.
संपादकीय भूमिकाप्रतिदिन ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना पहाता हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता हिंदूंनी आता तरी जाणावी ! |