सनातनचे संत पू. रमानंद गौडा यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे
१. ‘पू. रमानंद गौडा (सनातन संस्थेचे ७५ वे (समष्टी) संत, वय ४७ वर्षे) यांच्याकडे पाहून भावजागृती होते.
२. समष्टी सेवा करतांना ‘गुरुदेवांबद्दल (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याबद्दल) असणारा भाव मनात सदैव जागृत ठेवून सेवा कशी करावी ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.
३. ‘मनात सेवेचा भाव असेल, तरच गुरुसेवा होते, नाहीतर नुसती वरवर अपेक्षा ठेवून केलेले कार्य असफल होईल’, याची जाणीव मला पू. रमानंद गौडा यांचे बोलणे आणि मार्गदर्शन यांतून झाली.
४. ‘गुरुदेवांप्रति माझ्या मनात उत्कट भाव निर्माण झाला, तरच माझी समष्टी आणि व्यष्टी साधना सहज होऊ शकते’, हे माझ्या लक्षात आले.
५. केवळ आपल्याच एका उपक्रमापुरते मर्यादित न रहाता ‘पूर्ण जिल्ह्याच्या दृष्टीने व्यापक होऊन गुरुकार्याचा विचार झाला पाहिजे’, हे माझ्या लक्षात आले.
६. ‘कोण काय म्हणेल ? कोणाला काय वाटेल ?’, यापेक्षा ‘गुरुकार्य आणि गुरुसेवा यांची आवश्यकता काय आहे ?’, याचा विचार प्राधान्याने झाला पाहिजे’, हे माझ्या लक्षात आले. त्याचे गांभीर्यही माझ्या लक्षात आले.
७. सद्गुरु आणि संत चुका सांगतात. त्या वेळी ‘साधकांमध्ये पालट व्हावा’, हीच त्यांची आंतरिक तळमळ असते. त्यांची ‘प्रीती कशी असते ?’, हे मला जवळून पहाता आणि अनुभवता आले. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेबद्दल सकारात्मकता निर्माण होऊन माझी भीती अन् नकारात्मकता नष्ट झाली. गुरुदेवा, मला पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे.’
– कु. प्राची शिंत्रे, पुणे (२१.८.२०२३)