Ayodhya Holi 2024 : अयोध्येत ४९५ वर्षांनंतर भगवान श्री रामलल्लाने खेळली होळी !
अयोध्या – संपूर्ण रामनगरीत होळीचा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला. भगवान श्री रामलल्लानेही ४९५ वर्षांनंतर भव्य श्रीराममंदिरात होळी खेळली. या वेळी देशभरातून लोक मंदिरात पोचले होते.
श्री राम जन्मभूमि मंदिर में रंगोत्सव
Rangotsav at Shri Ram Janmabhoomi Mandir pic.twitter.com/nJgjb2QT7Z
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) March 25, 2024
मुसलमान आक्रमक बाबराने वर्ष १५२९ मध्ये श्रीराममंदिर पाडून तेथे मशीद बांधली. त्यानंतर ४९५ वर्षांनी तेथे भव्य श्रीराममंदिर बांधण्यात आले. एवढ्या मोठ्या कालावधीनंतर श्रीराममंदिर उभारल्यानंतर तेथे प्रथमच होळी खेळण्यात आली. त्यामुळे मंदिर आणि अयोध्यानगरी येथे विशेष उत्साह जाणवत होता. होळीच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम मठ-मंदिरांमध्ये उपस्थित देवतांना गुलाल अर्पण करून होळी खेळण्याची अनुमती मागण्यात आली.
भगवान श्री राम लला के भव्य मंदिर में विराजमान होने के पश्चात प्रथम होलिकोत्सव पर प्रफुल्लित भगवान और उनके भक्त। pic.twitter.com/kohSaNGPiv
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) March 24, 2024
श्री रामलल्लाची मूर्ती फुलांनी सजवली होती. श्रीराममंदिरात पुजार्यांनी श्री रामलल्लावर फुलांचा वर्षाव केला. यानंतर त्यांना गुलाल अर्पण करण्यात आला. या वेळी पुजार्यांनी होळीविषयी गीते गायली.
Bhagwan Shree Ram Lalla plays Holi in #Ayodhya after 495 years !
Ayodhya – The festival of #Holi was celebrated in a blissful atmosphere throughout the whole of Ayodhya.
Bhagwan Shree Ram Lalla too played Holi in the grand Shree Ram Mandir after 495 years. People from across… pic.twitter.com/EAT0XE5JIB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 25, 2024