हिंदूंनो, तुम्हाला हिंदुत्वहीन करणार्यांचा डाव हाणून पाडा !
‘देशात हिंदु बहुसंख्य आहेत. हिंदु हा सहिष्णु आहे. हिंदु धर्म हा सर्वांना सामावून घेणारा आहे; पण हे सर्व करतांना हिंदूंनी स्वतःच्या अस्तित्वाचाही विचार करायला हवा. आपल्या सहिष्णूतेचा अपलाभ घेऊन आपले अस्तित्व न्यून करणार्या घटकांचा डाव हाणून पाडला पाहिजे.
‘जिहाद’ म्हणजे काय ?
‘जिहाद’ या शब्दाला कुराणात महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. ‘जिहाद’ याचा सर्वसामान्यपणे अर्थ घेतला जातो, तो म्हणजे धर्मयुद्ध; परंतु इस्लामिक तत्त्वज्ञानांच्या मते त्याला व्यापक अर्थ आहे. ‘जिहाद’ हा मूळ अरबी शब्द. जिहाद याचा अर्थ प्रयत्न करणे, पराकाष्ठा करणे किंवा संघर्ष करणे. हा संघर्ष स्वतःतील वाईट प्रवृत्तीसमवेत करायचा आहे. जिहाद म्हणजे आत्मशुद्धी. ज्याला ‘जिहाद अल् अकबर’ असे म्हटले जाते, हा श्रेष्ठ प्रकारचा जिहाद आहे.
धर्मांध इस्लामी मूलतत्त्वांच्या मते जिहादची भयावहता !
जिहादचे अनेक प्रकार आहेत. उघड उघड युद्ध करणे शक्य नाही; म्हणून ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’ अशा अनेक प्रकारे जिहाद केला जाऊ लागला आहे. जिहादची ही वाढती व्याप्ती भयावह आहे.
लव्ह जिहाद !
भारतात ‘लव्ह जिहाद’चा अधिकृत स्तरावर सर्वप्रथम उच्चार केरळ उच्च न्यायालयाद्वारे करण्यात आला. या माध्यमातून मुसलमान तरुणांना हिंदु धर्मीय किंवा अन्य धर्मीय मुलींना फूस लावून किंवा बळजोरीने विवाह करण्यास भाग पाडले जाते. त्यांचे धर्मांतर केले जाते. यात २० टक्के ते ३० टक्के मुली बेपत्ता होतात. अशा प्रकरणांची योग्य ती चौकशी करून त्यातील सत्य बाहेर आले पाहिजे. दोषींवर योग्य कारवाई झाली पाहिजे.
ड्रग्ज (अमली पदार्थ) जिहाद !
जिहादचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे ‘ड्रग्ज जिहाद’ ! मुंबईत हा जिहाद मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्याचा उद्देशच मुळी अमली पदार्थांचा वापर करून तरुणांना व्यसनाधीन बनवणे.
दुर्लक्षित; पण धोकादायक भूमी जिहाद !
सगळ्यात दुर्लक्षित आणि धोकादायक जिहाद, ज्याची भयानकता हिंदूंच्या अजिबात लक्षात आलेली नाही, तो आहे भूमी (लँड) जिहाद ! सरकारी जागेत अवैधरित्या अतिक्रमण करून झोपड्या उभ्या करून धर्मांध बेकादेशीर वस्ती निर्माण करत आहेत. मुंबईतील मालवणीत मोठ्या प्रमाणात अशी बेकायदेशीर वस्ती वसलेली आहे. हा भूमी जिहादचा प्रकार का म्हणू नये ? कारण स्थलांतरित होणारे लोक हे स्थानिक नसून बाहेरून आलेले रोहिंग्या असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे सरकारी जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या लोकवस्ती निर्माण झाल्यानंतर लोकसांख्यिकीमध्ये पालट होतो, याचा परिणाम राजकीय घडामोडींवर होतो.
– श्री. मोहेश कुर्मी, सिवसागर, थोवरा, आसाम
निधर्मीवाद्यांची पालटलेली रणनीती !हळूहळू हा निधर्मी कावा हिंदूंच्या लक्षात येऊ लागला आहे. त्यामुळे आता याच कथित सेक्युलर लोकांनी आपला रोख थोडा पालटला आहे. आता त्यांनी हिंदु देवता, महापुरुष यांना अपकीर्त करण्याची मोहीम चालवली आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. थोडे काही झाले किंवा एखादी गोष्ट या निधर्मीवाद्यांच्या विरोधात जायला लागली की, हे लगेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची अपकीर्ती करू लागतात, मग रावण, महिषासुर अशा असुरांना नायक बनवण्यात येते. ‘हिंदूंचे सण कसे पर्यावरणाला घातक आहेत, नैसर्गिक साधनांची उधळपट्टी करणारे आहेत’, अशा प्रकारचा खोटा प्रचार चालवला जातो. हिंदूंच्या रितीरिवाजांना अपकीर्त करणारी विज्ञापने बनवली जातात. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक मुसलमान होते. त्यांच्या सैन्यात मुसलमान होते’, अशी लोणकढी थाप फेकली जाते. महाराजांना निधर्मी दाखवायचा प्रयत्न होतो. कोणताही हिंदु त्याचा आपला धर्म कुणावरही लादत नाही; पण जेव्हा महाराजांच्या लक्षात आले की, मंदिर पाडून तिथे मशिदी उभ्या केल्या आहेत. तेव्हा त्यांनी त्या मशिदी पाडून मंदिरे पुन्हा उभी केली; मात्र हे सत्य ही तथाकथित निधर्मी मंडळी तुम्हाला कधीच सांगणार नाहीत.’ – श्री. मोहेश कुर्मी |