आदिवासी शाळांतील मुलांचे दूध आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कोट्यवधी रुपयांचा अपहार !
आमदार रोहित पवार यांचा आरोप
पुणे – राज्यातील आदिवासी शाळांमध्ये देण्यात येणार्या दुधात ८० कोटींचा आणि सामाजिक न्याय विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या ‘पोषण आहारा’मध्ये २५० कोटी रुपयांचा अपहार झाला आहे, असा आरोप ‘शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस’चे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
आमदार रोहित पवार यांनी मांडलेली सूत्रे
१. सध्या २०० मिलीलिटर दूध ‘टेट्रा पॅक’मधून देण्यात येते. त्याचा दर २९.२० पैसे इतका आहे, म्हणजे १४६ रुपये लिटर असा होतो. त्यामध्ये ८० कोटी रुपयांचा अपहार झाला आहे.
२. राज्यातील ४४४ शासकीय वसतीगृहे आहेत. त्यातील ५७ सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. वर्ष २०१९-२० मध्ये प्रतिमास प्रतिविद्यार्थी ४ सहस्र रुपये दर होता. त्यात २५ टक्के वाढ करून तो ५ सहस्र २०० रुपये करण्यात आला. त्यासाठी प्रतिवर्षी ३५० कोटी याप्रमाणे ३ वर्षांमध्ये १ सहस्र ५० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले असून त्यामध्ये २५० कोटी रुपयांचा अपहार झाला आहे.