सातारा येथे बुलेटचालकांवर कारवाई !
सातारा, २४ मार्च (वार्ता.) – येथील मोती चौकात कर्कश आवाजाचे सायलेन्सर असणार्या बुलेटचालकांवर सातारा पोलिसांनी कारवाई केली. गत काही दिवसांपासून शहरात कर्कश आवाजाचे सायलेन्सर असणारे बुलेटचालक सुसाट वेगाने बुलेट चालवत होते. त्याचा वृद्ध नागरिक आणि महिला यांना त्रास होत होता. याची गंभीर नोंद घेत सातारा पोलिसांनी अशा बुलेटचालकांवर कायद्याचा बडगा उगारत कारवाई केली.