नाशिक येथे कृत्रिमरित्या आंबे पिकवणार्यांच्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची मोहीम !
नाशिक – शहरातील काही आंबे विक्रेते कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून कच्ची फळे कृत्रिमरित्या पिकवत आहेत. अशा आंबे विक्रेत्यांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफ्.डी.ए.) मोहीम उघडली असून नाशिकमध्ये त्यांच्या पथकांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
अनैसर्गिकरित्या पिकलेले आंबे खाणे आरोग्यास चांगले नसते. कच्चे आंबे वाहतुकीच्या दृष्टीने पाठवणे योग्य असते. आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आर्सेनिक आणि फॉस्फरस हे घटक असलेल्या औषधांचा वापर केला जातो.
नाशिक शहरात रत्नागिरी, देवगड, राजापूर इत्यादी कोकण विभागासमवेत कर्नाटक राज्यातून आंबे मोठ्या प्रमाणात येतात.