निवडणूक कामकाज करणार्‍यांना रोकडविरहित वैद्यकीय सुविधा पुरवा ! – जिल्हाधिकारी

सातारा, २४ मार्च (वार्ता.) – आगामी लोकसभा निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांना रोकडविरहित वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ जाहीर केली आहे. या कामासाठी विविध ठिकाणी मतदान अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या काळात कोणतीही दुर्घटना झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना तात्काळ रोकडविरहित वैद्यकीय उपचार (कॅशलेस ट्रिटमेंट) सुविधा पुरवण्यात येईल.