चोरी करणार्या भावाला सोडवण्यासाठी बहिणीचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न
नागपूर – घरफोडीच्या चौकशीसाठी अल्पवयीन भावाला कह्यात घेतल्याने हुडकेश्वर पोलीस ठाण्यातच २३ वर्षीय बहिणीने हातावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तरुणीला रुग्णालयात भरती करून तिच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला.
पोलीस ठाण्यात भावाने घरफोडी केल्याचे मान्य केले. घरफोडीतील दागिने अल्पवयीन १६ वर्षीय मुलगा आणि त्याच्या भावाला दिल्याचे त्याने सांगितले. त्याच वेळी बहिणीने पोलीस ठाण्यात येऊन ‘भावाला सोडून द्या’, असे सांगत वरील कृत्य केले.