पकडलेला आरोपी पळून जाणे, ही आहे पोलिसांची कार्यक्षमता !
‘बदायू (उत्तरप्रदेश) येथे २ लहान हिंदु मुलांची साजिद आणि त्याचा भाऊ जावेद या केशकर्तनालय चालवणार्या तरुणांनी चाकूद्वारे गळे चिरून हत्या केल्याची घटना १९ मार्च २०२४ च्या सायंकाळी घडली. या वेळी मुलांच्या आईने आणि आजीने या दोघांना घरात बंद करून त्या बाहेर आल्या आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन साजिदला पकडले, तर जावेद पळून गेला. साजिदला पोलीस गाडीतून घेऊन जात असतांना तो तेथून पळाला. तो येथून काही अंतरावरील जंगलात आढळून आला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने पोलिसांवर गोळीबार केला. यात एका पोलीस निरीक्षकाला गोळी लागली. यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात साजिद ठार झाला.’ (२१.३.२०२४)