ठाकुर्ली (डोंबिवली) येथील गावदेवी मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरीला !
ठाणे, २४ मार्च (वार्ता.) – ठाकुर्ली येथून कल्याणच्या दिशेने जाणार्या ९० फूट रस्त्यावर असलेल्या कचोरे गाव भागातील गावदेवी मंदिरात पुन्हा एकदा चोरी झाली आहे. २ अज्ञात चोरट्यांनी दुपारी २ वाजता मंदिरात जाऊन देवीच्या चांदीच्या पादुका चोरून नेल्या. (असुरक्षित डोंबिवली शहर ! – संपादक) हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात बंदिस्त झाला आहे.
स्त्रोत: HP Live News
या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.