पुणे येथे ७ वर्षीय बालिकेवर अत्याचार करत हत्या करणार्या नराधमाला फाशीची शिक्षा !
गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याने आरोपीच्या आईलाही ७ वर्षांचा कारावास !
पुणे – येथील मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावामध्ये २ ऑगस्ट २०२२ या दिवशी ७ वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर नराधमाने तिची हत्या केली होती. या प्रकरणाची सुनावणी पुणे येथील शिवाजीनगर सत्र न्यायालयामध्ये झाली. या वेळी न्यायालयाने तेजस उपाख्य दादा महिपती दळवी या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या घटनेनंतर कामशेत पोलिसांनी अन्वेषणाची सूत्रे गतीने फिरवत अवघ्या २४ घंट्यांमध्ये आरोपीला अटक केली होती. पोलिसांनी केलेल्या अन्वेषणामध्ये आरोपीच्या आईचाही या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे समोर आले होते. मुलाने केलेल्या कृत्यानंतर गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी आईनेच साहाय्य केल्याचे अन्वेषणामध्ये समोर आले होते. त्यामुळे तिलाही ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकामहिलांवर अत्याचार करणार्या सर्वच प्रकरणांचे अशा प्रकारे निकाल लावले तरच महिलांवरील अत्याचार थांबतील ! |