मंदिराजवळ भटक्या कुत्र्यांना मांस खायला देणार्या महिलांवर गुन्हा नोंद !
मुंबई – दक्षिण मुंबईमधील श्री महालक्ष्मी मंदिराच्या जवळ भटक्या कुत्र्यांना मांस खायला घालणार्या नंदिनी बेलेकर आणि पल्लवी पाटील या महिलांच्या विरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
स्थानिक रहिवासी शीला शहा यांनी याविषयी पोलिसांत तक्रार केली होती. मंदिराजवळ भटक्या कुत्र्यांना मांस खायला घातल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्यामुळे मंदिराच्या परिसरात मांस खायला न घालण्याविषयी काही स्थानिक नागरिकांनी या महिलांना विनंती केली होती; मात्र वारंवार सांगूनही महिला ऐकत नसल्यामुळे काही स्थानिक नागरिकांनी पोलिसांत तक्रार केली होती.
यावर पोलिसांनी महिलांना असे न करण्याविषयी समज दिली होती; मात्र त्यानंतर न ऐकणार्या या महिलांच्या विरोधात पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला.
संपादकीय भूमिका
|