सद्गुरु स्वाती खाडये यांचा साधकांप्रतीचा वात्सल्यभाव !
१. सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधकांना नवनवीन पदार्थ बनवून देणे
‘सद्गुरु स्वातीताई साधकांसाठी किती करतात ! एकदा त्यांना आश्रमात येतांना वाटेत चांगली वांगी दिसली. त्यांनी साधकांसाठी ती वांगी आणली. त्यांनी वांगी भाजून भरीत केले. त्यांनी काही दिवसांनी साधकांसाठी वांगी-भात केला. त्यांच्या या कृतीतून ‘साधकांना नवीन पदार्थ खायला मिळायला हवेत’, अशी तळमळ मला दिसून आली.
२. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या दिवशी साधकांसाठी फोडणीचा भात करणे
एकदा हिंदु राष्ट्र-जागृती सभा असतांना त्या दिवशी केवळ सद्गुरूंसाठीच स्वयंपाक केला होता. साधकांसाठी बाहेरून महाप्रसाद येणार होता. महाप्रसादाची वेळ होऊन गेली, तरी साधकांसाठी महाप्रसाद आला नाही. तेव्हा सद्गुरु ताई स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी भाताला फोडणी दिली. त्यांनी साधकांना फोडणीचा भात करून दिला. खरेतर त्यांना त्या दिवशी असलेल्या सभेत मार्गदर्शन करायचे होते.
तेव्हा मला त्यांच्यातील प्रीती अनुभवायला आली. ‘आईच असे करू शकते’, असे मला वाटले. खरेच सद्गुरु ताई म्हणजे साधकांच्या आई !’
– श्रीमती वैशाली पारकर (वय ७३ वर्षे), कुडाळ सेवाकेंद्र (२८.२.२०२३)