आपत्काळात ‘विष्णुलीला सत्संग’रूपी लाभली संजीवनी ।
आपत्काळात ‘विष्णुलीला सत्संग’रूपी लाभली संजीवनी ।
गुरुमाऊली जाणते, काय होणार ते व्यष्टी आणि समष्टी जीवनी ।। १ ।।
यास्तव सद्गुरु स्वातीताईंनी (टीप) ‘सत्संगा’चे केले नियोजन ।
या आपत्काळातही साधकांस नसे कशाची उणीव ।। २ ।।
किती भरभरून देत आहेस देवा, प्रत्येक क्षणी ।
या अज्ञानी जिवांना कळू दे, तुझी लीला क्षणोक्षणी ।। ३ ।।
श्वासोश्वासी नाम अन् कृतज्ञता राहू दे अंतर्मनी ।
अंतःकरणात व्यक्त होऊ दे कृतज्ञता गुरुचरणी ।। ४ ।।
कसे फेडावे ऋण गुरुचरणांचे ।
ध्यास लागू दे उद्धाराचा अर्पूनी पुष्प सर्वस्वाचे ।। ५ ।।
टीप : सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
– सौ. सुनीता पंचाक्षरी, अंबाजोगाई, बीड, मराठवाडा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |