मंदिर परिसरात मद्य आणि मांस यांची होणारी विक्री थांबवावी !
दापोली येथे प्रशासनाला महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने निवेदन
दापोली, २४ मार्च (वार्ताहर) – मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत. त्यांचे पावित्र्य जपणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे; परंतु काही ठिकाणी मंदिर परिसरात मद्य आणि मांस यांची विक्री केली जाते, असे भाविकांकडून सांगण्यात आले आहे. हे प्रकार त्वरित थांबवावेत, अशा मागणीचे निवेदन येथील प्रांताधिकारी, तसेच तहसीलदार यांना महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने देण्यात आले. येथील उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले आणि तहसीलदार श्रीमती अर्चना बोंबे घोलप यांनी हे निवेदन स्वीकारले.
निवेदन देते वेळी गुरव समाज रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. लक्ष्मण गुरव, महालक्ष्मी देवस्थान जालगाव ब्राह्मणवाडीचे उपाध्यक्ष श्री. सुरेश रेवाळे, श्री. सुरेश मिसाळ, श्री. अशोक भांबिड, भैरी मंदिर गव्हेचे अध्यक्ष श्री. अरुण पालटे, भैरी मंदिर जालगावचे श्री. राजेंद्र चोरगे, काळकाई मंदिर दापोलीचे अध्यक्ष श्री. प्रभाकर चोरगे, संदेश शिंदे, विजय वारसे, महामाई मंदिर आघारीचे श्री. संजय पिवाळ, भैरवनाथ मंदिर मुरुडचे श्री. नारायण घाग, विठ्ठल मंदिर चंद्रनगरचे श्री. विकास जगदाळे, हनुमान मंदिर हर्णेचे श्री. दर्शन मोरे, विठ्ठल मंदिर हर्णैच्या सौ. दुर्वा मोरे, वरजाई मंदिर गिम्हवण्याचे श्री. श्रीकांत मंडपे यांसह १० मंदिरांचे १८ विश्वस्त उपस्थित होते.