बांगलादेशात हिंदूंच्या प्राचीन मंदिराच्या भूमीवर मुसलमानांकडून अनधिकृतरित्या बांधली जात आहे मशीद !
|
दिनाजपूर (बांगलादेश) – येथील काहरुल उपजिल्ह्यातील प्राचीन कांतज्जू हिंदू मंदिरावर मुसलमानांनी नियंत्रण मिळवले असून मंदिराच्या भूमीवर मशीद बांधण्यात येत आहे. या बांधकामाचा प्रारंभ येथील मुसलमान खासदार महंमद झकारिया झका यांनी केला. स्थानिक हिंदूंकडून मंदिर कह्यात घेण्याला विरोध करण्यात येत आहे. या प्रकरणी बांगलादेशातील अल्पसंख्यांक गटांनी एकमताने पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. येथील रहिवासी रणजीत कुमार यांनी सांगितले की, मंदिराची एकूण भूमी ६२.४६ एकर आहे. या भूमीची विविध सरकारी विभागांमध्ये नोंद आहे.
१. बांगलादेशमधील हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन युनिटी कौन्सिलने मंदिराच्या भूमीवरील या अनधिकृत नियंत्रणाच्या अन् मशिदीच्या बांधकामाच्या संदर्भात अप्रसन्नता व्यक्त केली आहे. त्यांनी या ठिकाणाचे ‘पुरातत्व आणि ऐतिहासिक ठिकाण’ म्हणून वर्णन केल्याचे सांगितले. खासदार झकेरिया यांच्याखेरीज या क्षेत्राचे उपायुक्त शकील अहमद यांच्यावरही नियंत्रणाच्या कटात सहभाग असल्याचा आरोप हिंदूंनी केला आहे.
२. हिंदु संघटनांनी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केल्यानंतर सध्या बांधकाम थांबवण्यात आले आहे; मात्र तरीही रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने बेकायदा बांधकाम चालू असल्याचा आरोप या बांधकामाला विरोध करणारे रतन सिंह यांनी केला आहे.
संपादकीय भूमिका
|