Prakash Ambedkar : संविधान पालटण्यासाठीच भाजपला ४०० हून अधिक जागा हव्या आहेत ! – प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर

मुंबई – देश चालवण्यासाठी ३०० जागा पुरेशा असतात. ४०० जागा संविधान पालटण्यासाठीच लागतात. ‘संधी मिळाली, तर आम्ही संविधान पालटू’, अशी शपथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वर्ष १९५० मध्येच घेतली होती, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केले. ‘४०० पार’ या भाजपच्या यंदाच्या निवडणुकीच्या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

महाविकास आघाडीला त्यांच्यातील जागावाटपाचा तिढा सोडवता येत नाही. त्यांनी आम्हाला अवघ्या ४ जागा देऊ केल्या होत्या, त्यामुळे त्या जागा मी त्यांनाच परत करतो. काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील अशा ७ जागांची माहिती काँग्रेसने आम्हाला द्यावी. आम्ही त्यांना निश्‍चितपणे साहाय्य करू, असेही ते या वेळी म्हणाले.

संपादकीय भूमिका

  • संविधानात नवीन शब्द घुसडून काँग्रेसने यापूर्वीच पालट केला आहे. जर त्यात नवीन शब्द घुसडली जाऊ शकतात, तर ती काढण्याचा पालट व्हायला काय अडचण आहे ?
  • लोकशाही म्हणजे ‘लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य असेल’, तर लोकांच्या हितासाठी जे जे आवश्यक आहे, ते करणे उचित नाही का ?