Greece Politician Slams Pakistan : पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना मूलभूत अधिकार नाहीत !
ग्रीक नेत्याने पाकव्याक्त काश्मीरवरून पाकिस्तानला सुनावले !
अथेन्स (ग्रीक) – पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना त्यांच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे, अशा शब्दांत ग्रीक नेते कॉन्स्टँटिनोस बोगदानोस यांनी पाकिस्तानला सुनावले. संयुक्त राष्ट्रांच्या जिनिव्हा कार्यालयाने तुर्कीयेच्या कह्यात असलेल्या सायप्रसच्या अहवालाचा संदर्भ दिला होता, जो पाकिस्तानने नाकारला होता. यावरून बोगदानोस यांनी पाकला फटकारले.
Greek politician Konstantinos Bogdanos calls out Human rights violations by Pakistan in PoJK.
“People of Pakistan occupied Kashmir devoid of basic freedom…” pic.twitter.com/CMTfzHkREN
— Jammu-Kashmir Now (@JammuKashmirNow) March 23, 2024
ग्रीक आणि भारत आक्रमकतेविरुद्ध एकत्र उभे आहेत !
कॉन्स्टँटिनोस बोगदानोस यांनी म्हटले की, पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तान भागातील लोक पाकिस्तानच्या दडपशाहीच्या धोरणांची साक्ष देतात. या प्रदेशात कोणत्याही प्रकारच्या छळाचा एक युरोपीयन आणि ग्रीक म्हणून माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. आजच्या जगात कोणताही देश आपल्या लोकांना मूलभूत स्वातंत्र्याचा अधिकार नाकारू शकत नाही. जेव्हा मी व्यापलेल्या प्रदेशांविषयी बोलतो, तेव्हा मी उत्तर सायप्रसचा विचार करतो. ग्रीक आणि भारत आक्रमकतेविरुद्ध एकत्र उभे आहेत. पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तान यांच्या संबंधात आंतरराष्ट्रीय कायदा, लोकशाही आणि समानता यांच्या तत्त्वांनुसार पाकिस्तान सरकारच्या धोरणाचा पुनर्विचार करावा, असे मी आवाहन करतो.
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी या आठवड्यात सायप्रसविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ग्रीक अप्रसन्न आहे. सायप्रस हा तुर्की साम्राज्याचा भाग असायला हवा, असे एर्दोगन म्हणाले होते. वर्ष १९७४ मध्ये तुर्कीयेने सायप्रसवर आक्रमण केले होते. त्याविषयी एर्दोगन म्हणाले की, त्या वेळी आमच्या सैन्याने पुढे चाल केली असती, तर आज सायप्रस ही समस्या नसती.