मतदारांना योजनांच्या माध्यमातून प्रलोभने देण्याचा उमेदवारांचा प्रयत्न !

ठाणे येथे आचारसंहितेचा भंग !

ठाणे – येथील सावरकरनगर भागात आचारसंहितेचा भंग करून मतदारांना विविध योजनांचे प्रलोभन दाखवण्यात येत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडून केंद्र सरकारच्या योजनांचा आधार घेतला जात आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीच्या योजनांचे अर्ज भरून देण्याचे काम केले जात आहे.