खडवली येथे झोपडपट्टीतून दगड मारणार्यांचा शोध चालू !
कल्याण – मध्य रेल्वेच्या टिटवाळा-खडवली रेल्वेस्थानकांच्या दरम्यान कसारा गाडीवर रात्री ८ वाजता २० मार्च या दिवशी झोपडपट्टीतून लोकलगाडीच्या दिशेने दगड मारल्याची घटना घडली. रेल्वेस्थानक परिसरात तातडीने शोध घेऊन आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. आरोपी आढळून आले नाहीत. सीसीटीव्ही चित्रण तपासून आरोपींचा शोध चालू आहे.
या घटनेत २ प्रवासी गंभीर घायाळ झाले. एकाच्या डोक्याला दुखापत झाली. दोघांना तत्परतेने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यापूर्वी आंबिवली, शहाड परिसरात लहान मुले रेल्वेमार्गात खेळतांना गाडीवर दगड फेकत अनेकदा उघडकीस आले आहे.