श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अंतर्गत रिक्त पदे भरतांना धाराशिव जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्य द्या ! – शिवबाराजे प्रतिष्ठान
धाराशिव – तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडून रिक्तपदे भरण्यासाठी विज्ञापन प्रसिद्ध झाले आहे. धाराशिव हा दुष्काळसदृश्य जिल्हा असून जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग, व्यापार नाही. जिल्ह्यातील अनेक तरुण सुशिक्षित असून बेरोजगार आहेत. त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत विविध संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरतांना तुळजापूर तालुका, तसेच धाराशिव जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशा मागणीचे निवेदन ‘शिवबाराजे प्रतिष्ठान’च्या वतीने धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांना देण्यात आले. निवेदनावर निश्चित विचार करू, असे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी या प्रसंगी दिले.
या प्रसंगी ‘शिवबाराजे प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन (आप्पा) साळुंके, विकास वाघमारे, दत्ता तुपे, बबलू राऊत, दीपक शेळके, उल्हास घोगरे उपस्थित होते.