ठाणे येथील घोडबंदर रस्त्यावर वारंवार अपघात
ठाणे – भाईंदरपाडा येथे पहाटेच्या वेळी एक दांपत्य कामावर जाण्यास निघाले होते. एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे दुचाकी पुढे घसरत गेली. दुचाकीवरील दांपत्य खाली पडून महिला गंभीर घायाळ झाली. पतीने साहाय्यासाठी वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र कुणीच थांबले नाही. शेवटी पोलिसांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी तातडीने महिलेला रुग्णालयात भरती केले. येथे वारंवार जीवघेणे अपघात घडल्याने हा घोडबंदर रस्ता वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यातील चित्रीकरणाची पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे.