मुंबईत मिळेल तेथे झोपड्या उभारणे हे सरकार आणि महापालिका यांचे अपयश ! – मुंबई उच्च न्यायालय
सुनावणी ४ एप्रिलपर्यंत स्थगित
मुंबई – येथे जिथे मोकळी जागा मिळेल, तिथे लोक झोपड्या उभारतात, सरकारकडे परवडणार्या घरांविषयीच्या धोरणाचा अभाव असल्याने असे घडते, हे सरकार आणि महापालिका यांचे अपयश आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. शीव येथील तानसा पाईपलाईन शेजारील रहिवाशांचा अद्याप पुनर्विकास झालेला नाही. त्यामुळे तेथील कुटुंबांनी पुनर्वसनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर न्या. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपिठासमोर सुनावणी घेण्यात आली. ही सुनावणी ४ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.