हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी पोलीस आधीच स्वतःहून कृती का करत नाहीत ?
‘मिरज येथील साहिल गौस पटेल (रहाणार मुजावर गल्ली, मिरासाहेब दर्ग्यामागे, मिरज) या धर्मांधाने ‘बजरंग बलीने इस्लाम कुबूल किया है’ (बजरंग बलीने इस्लाम स्वीकारला आहे), अशा आशयाचा व्हिडिओ असणारा ‘स्टेटस’ व्हॉट्सॲपवर १६ आणि १७ मार्च २०२४ या दिवशी ठेवला होता. या व्हिडिओमध्ये एका माकडाने गोल टोपी घालून वाकल्याचे (नमाजपठण करत असलेले) दृश्य होते. अनेक धर्माभिमान्यांनी त्याच्या विरुद्ध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी रितसर तक्रार नोंदवली. मिरज शहर पोलीस ठाण्याकडून त्याला अटक करण्यात आली आहे.’ (२०.३.२०२४)