असे आहेत आम आदमी पक्षाचे भ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेते !
‘देहली मद्य घोटाळा प्रकरणात देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने ७ वेळा चौकशीसाठी समन्स बजावूनही ते उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने त्यांना १६ मार्च २०२४ या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला होता. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या दिवशी न्यायालयात उपस्थित राहिल्यावर न्यायालयाने १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन संमत केला. (अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च २०२४ या दिवशी देहली उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालय यांनी जामीन नाकारल्याने अटक करण्यात आली अन् अंमलबजावणी संचालनालयाच्या न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची कोठडी सुनावली आहे. – संपादक)
देहली मद्य घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते आणि देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाली आहे. या प्रकरणात ‘ईडी’ने आतापर्यंत जवळपास ३० हून अधिक ठिकाणांवर छापे घातले होते. यामध्ये मनीष सिसोदिया, आपचे खासदार संजय सिंह यांच्या निवासस्थानांचाही समावेश होता. याआधी या प्रकरणी ‘ईडी’ने आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना चौकशीनंतर अटक केली होती.’ (१७.३.२०२४)