सनातन संस्थेबद्दल संतांचे गौरवोद्गार !
सनातन संस्थेमुळे राष्ट्र आणि धर्म यांचा सर्वांगीण विकास होणार !
‘राष्ट्र आणि धर्म यांचा सर्वांगीण विकास सनातन संस्थेमुळे होणार आहे’, हे लक्षात येईल. हिंदु समाज, संस्कृती आणि परंपरा, यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि पेशव्यांनी त्याचा विस्तार केला. आता तोच संकल्प पूर्ण करण्याचे कार्य अनेक संघटना करत आहेत. यामध्ये सनातन संस्था विशुद्ध भावनेने हे कार्य करत आहे.’
– आचार्य श्री स्वामी प्रणवानंद सरस्वती, महामंडलेश्वर, मथुरा-वृंदावन, उत्तरप्रदेश. (वर्ष २०१९)
सनातन संस्थेचे कार्य विश्वकल्याणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक !
सनातन संस्थेच्या माध्यमातून या देशात राष्ट्रीय असलेला आणि अनेक शतके निद्रिस्त राहिलेला हिंदु समाज जागवण्याचे कार्य अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, समर्पित वृत्तीने अन् जागरूकतेने केले जात आहे. विश्वकल्याणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेले हे कार्य सनातन संस्था करत आहे; कारण जगाचे कल्याण भारताच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे आणि भारताचे सामर्थ्य हिंदूंच्या जागरणावरच अवलंबून आहे. या पवित्र कार्यास माझ्या शुभकामना !’
– प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज (मे २०१९)
सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनात ज्ञानरूपी साक्षात् सरस्वती वहात आहे !
प्रयाग येथील कुंभमेळ्यातील प्रदर्शनाला भेट दिल्यावर काशी येथील रहिवासी आणि १० वर्षांपासून ईशान्येकडील राज्यांत एकटे राहून धर्मांतर रोखण्याचे कार्य करणारे डॉ. प्रभु नारायण करपात्री म्हणाले, ‘‘प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील त्रिवेणी संगमावर गंगा आणि यमुना नदी दिसते; मात्र त्या ठिकाणी लुप्त असणारी सरस्वती नदी दिसत नाही. सनातन संस्थेच्या प्रदर्शनात आल्यावर येथे लुप्त सरस्वती वहात असल्याचे दिसते. सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे.’’ (वर्ष २०१८)
सनातन संस्था घरोघरी जाऊन धर्मजागृतीचे अतिशय चांगले कार्य करत आहे !
‘सनातन संस्थेचे साधक अतिशय मधुरभाषिक असतात. ते न्यूनतम आवश्यकतांमध्ये जगतात आणि राष्ट्र अन् धर्म यांचे अधिकाधिक कार्य करण्याची कामना करतात. कठीण प्रसंगातही स्वत:चे निरीक्षण करणे, ही अतिशय आश्चर्याची गोष्ट मी त्यांच्यात पाहिली आहे. त्यांना चांगले मार्गदर्शन मिळत आहे. घरोघरी जाऊन धर्मजागृती करण्याचे अतिशय चांगले कार्य सनातन संस्था करत आहे.’
– प्रवर श्रद्धेय श्री त्र्यंबकेश्वर चैतन्यजी महाराज, अखिल भारतवर्षीय धर्मसंघ आणि करपात्री फाऊंडेशन (वर्ष २०१८)